Ad will apear here
Next
ठाणे येथे दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरुवात
लाचलुचपत लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत आयोजन
ठाणे : ‘यावर्षी राज्यात २९ ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर २०१८ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत जिल्ह्यातील राज्य सरकारचे विभाग, सहकारी संस्था, स्वायत्त संस्था, तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये यासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे,’ अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिली.

२९ ऑक्टोबरला सर्व शासकीय कार्यालयांत भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन सप्ताहाला सुरुवात होणार आहे. सप्ताहाबाबत माहिती होण्यासाठी सर्व कार्यालयांत फलक, बॅनर्स लावणे, शाळा, महाविद्यालयांत भ्रष्टाचाराच्या परिणामांची माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चित्रपटगृहे, सार्वजनिक ठिकाणे याठिकाणी या मोहिमेची व्यापक प्रसिद्धी केली जाईल. याशिवाय प्रमुख कार्यालयांत बैठका घेऊन लाचखोरीसंदर्भात, तसेच विभाग करीत असलेल्या कार्यवाहीची, कायद्यातील तरतुदींची व्यापक माहिती देण्यात येणार आहे.

ठाणे कार्यालयाच्या परिक्षेत्रात ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे येत असून, याठिकणीही विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. या उपक्रमात अशासकीय संघटना, स्वयंसेवी संस्थाबरोबर नागरिकांनी सहभागी होण्याचे, तसेच लाचेसंदर्भातील तक्रारींची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

लाचेसंदर्भातील तक्रारी देण्यासाठी संपर्क : १०६४
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचा ई-मेल : spacbthane@mahapolice.gov.in 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZJSBT
Similar Posts
‘आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करणे हे सरकारी कर्मचाऱ्यांचे कर्तव्य’ ठाणे : ‘तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून सरकारी कामांमध्ये पारदर्शकता ठेवून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना जलद गतीने देण्यासाठी प्रयत्न करावेत. शासकीय सेवकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करण्याचे कर्तव्य पार पाडावे. आपण जनतेचे सेवक असल्याची भावना कायम मनात दृढ ठेवून
कोपरीची चौपाटी बनणार इतिहासाची साक्षीदार ठाणे : ठाण्याच्या खाडीकिनारी असलेल्या ऐतिहासिक तोफांचे लवकरच संरक्षण होणार असून, पर्यटकांना पाहण्यासाठी त्या दर्शनी भागावर ठेवण्यात येणार आहेत. पुरातत्त्व विभाग, ठाणे महानगरपालिका, मेरिटाइम बोर्ड आणि दुर्गवीर प्रतिष्ठानने या कामासाठी पुढाकार घेतला आहे. कोपरी येथील खाडीकिनारी मातीमध्ये गाडण्यात आलेल्या
डुरक्या घोणसाला सर्पमित्राकडून जीवदान ठाणे : शहरातील पूर्वेकडील सावरकर नगर परिसरात आढळलेल्या तीन फूट लांबीच्या डुरक्या घोणस सापाला सर्पमित्रांनी नुकतेच पकडून सुरक्षित स्थळी सोडून दिले.
मुख्यमंत्री दालन मुलांच्या किलबिलाटाने गजबजले ठाणे : ‘मुख्यमंत्री महोदय, तुम्ही आमच्या शाळेला भेट द्याल का?’ ‘आम्हाला नागपूरची संत्री मिळणार का? ‘मला अमृता काकूंचं गाणं खूप आवडतं’....... ठाण्यातल्या विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने पोस्टकार्डांवर व्यक्त केलेले विचार वाचून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोकळेपणाने दाद दिली. निमित्त होते नऊ ऑक्टोबरच्या जागतिक टपाल दिनाचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language